कोळी समाजाच्या पारंपरिक उत्सवांचे जतन आणि मच्छिमारांच्या सुविधांसाठी मंत्री नितेश राणे यांना निवेदन
कोळी समाजाच्या पारंपरिक उत्सवांचे जतन आणि मच्छिमारांच्या सुविधांसाठी मंत्री नितेश राणे यांना निवेदन
पनवेल :
कोळी समाजाच्या पारंपरिक सण-उत्सवांचे जतन व संवर्धन करून त्यांचे सुरक्षित आयोजन व्हावे, तसेच मासेमारी व्यवसायाशी संबंधित बंदरांवरील (धक्क्यांवरील) आवश्यक सुविधा आणि पायाभूत विकासकामे मार्गी लागावीत, या मागण्यांसाठी पनवेल येथील एकविरा आई मासळी बाजार कोळी महिला संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन संस्थेच्या प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. कोळी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन, सण-उत्सवांचे सुरक्षित आयोजन आणि मासेमारी व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी कोळी समाजाची संस्कृती, परंपरा आणि मासेमारी व्यवसायाशी निगडित प्रश्न सो