कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या चार बालकांना प्रत्येकी ५ लाखांचा आर्थिक आधार

0
6

वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुदतठेवीच्या मॅच्युरिटी रकमेचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते वितरण

सिंधुदुर्ग :
कोविड-१९ महामारीच्या काळात दोन्ही पालक गमावलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार बालकांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या मुदतठेवीच्या मॅच्युरिटी रकमेचा लाभ प्रदान करण्यात आला. वयाची २१ वर्षे पूर्ण केल्यानंतर संबंधित बालकांना हा निधी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या चार बालकांना प्रत्येकी ५ लाखांचा आर्थिक आधार
कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या चार बालकांना प्रत्येकी ५ लाखांचा आर्थिक आधार
महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत संबंधित बालकांची नोंद करण्यात आली होती. तसेच शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते चारही बालकांना मुदतठेवीच्या मॅच्युरिटी रकमेचा लाभ देण्यात आला. कोविड-१९ महामारीच्या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या भवितव्याला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे संबंधित बालकांना हा लाभ मिळाला आहे.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बापू भिकू शिणगारे, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी. जी. काटकर, विधी सल्लागार मृगाली नाईक, परिविक्षा अधिकारी महेश कळंत्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उदय मालवणकर, संरक्षण अधिकारी दीपिका सावंत, क्षेत्रीय कार्यकर्ता अपेक्षा दंताळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here