शिवाजी विद्यामंदिर, काळसेच्या विद्यार्थ्यांचा ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ उपक्रम
शिवाजी विद्यामंदिर, काळसेच्या विद्यार्थ्यांचा ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ उपक्रम
विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व प्रात्यक्षिकातून शिकवले
काळसे :
शिवाजी विद्यामंदिर, काळसे येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम राबवून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविल्यास भूजल पातळी वाढण्यास कशी मदत होते, याचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
पाण्याची वाढती गरज आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता जलसंधारणाच्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना लहान वयातच मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पाणी अडविणे, ते जमिनीत जिरविणे तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भूजल पातळी वाढविण्याचे महत्त्व आणि जलसंधारणाच्या विविध पद्धती यांची माहिती प्रत्यक्ष कृतीतून मिळाली. पर्यावरण संवर्धनासोबतच पाणी बचतीचा संदेश देणारा हा उपक्रम शाळेच्या वतीने राबविण्यात आला.