ओरोस येथे ९ ऑक्टोबरला न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, वकील व पक्षकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर
ओरोस येथे ९ ऑक्टोबरला न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, वकील व पक्षकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर
६० वर्षांवरील पक्षकारांना मोफत चष्म्यांचे वाटप; जिल्हा न्यायालय संकुलात आयोजन
ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयीन बेलीफ कर्मचारी (गट-क) संघटनेच्या वतीने न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, वकील तसेच पक्षकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा न्यायालय संकुल, सिंधुदुर्ग, ओरोस येथे होणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने दररोज न्यायालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, वकील आणि पक्षकारांना नेत्रविषयक तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, शिबिरामध्ये ६० वर्षांवरील पक्षकारांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.