खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करा; शेतकऱ्यांना वेळेत खते-बियाणे उपलब्ध करा – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीविषयक मार्गदर्शन वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे तसेच खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातून कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील खरीप हंगाम २०२६ संदर्भातील आढावा बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्य वेळेत उपलब्ध करून देणे, पुरवठा व्यवस्थापन तसेच कृषी मार्गदर्शन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (Tripti Dhommise), कृषी अधीक्षक तसेच संबंधित तीनही तालुक्यांतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना समन्वय राखून काम करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असेही स्पष्ट केले.


