एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ; आता ३० जून २०२६ पर्यंत संधी

0
29
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ; आता ३० जून २०२६ पर्यंत संधीएचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ; आता ३० जून २०२६ पर्यंत संधी
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ; आता ३० जून २०२६ पर्यंत संधी

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ; आता ३० जून २०२६ पर्यंत संधी

Mumbai :
राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि वाहनांची ओळख अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठीची मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.

यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील एचएसआरपी बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक राहणार आहे. जे वाहन मालक या नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून ₹१,००० पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच एचएसआरपीसाठी नोंदणी करून आगाऊ वेळ निश्चित करावी. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here