विद्या विहार स्थानकात विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक; प्रवाशांना नियोजनपूर्वक प्रवासाचे आवाहन

0
32

मुंबई

Central Railway च्या मुंबई विभागात विद्या विहार स्थानक येथे मधल्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी १५/१६, १६/१७ आणि १७/१८ मे २०२६ रोजी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या ब्लॉकदरम्यान काही लोकल तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, काही गाड्या रद्द किंवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक, रद्द किंवा बदललेल्या गाड्यांची माहिती आणि उपलब्ध पर्यायी व्यवस्था तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी सहकार्य करण्याचेही आवाहन केले असून, पादचारी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी हे काम महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here