खारेपाटण येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामाला सुरूवात
खारेपाटण | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी २) इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन खारेपाटण येथे नुकतेच पार पडले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून या कामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
रामेश्वर नगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पहिल्या टप्प्यात ६० लाख रुपये इतका निधी मंजूर झाला असून, उर्वरित बांधकामासाठी पुढील टप्प्यात निधी प्राप्त होणार आहे. या प्रकल्पात स्वतंत्र आरसीसी इमारत, कर्मचारी निवासस्थान आणि कार्यालय अशा सर्व आवश्यक सुविधांचा समावेश राहणार आहे. खारेपाटण ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मंजुरीच्या टप्प्यापर्यंत पोहोचला.
या भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच सौ. प्राची इसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, माजी पंचायत समिती सदस्या सौ. तृप्ती माळवदे, माजी सरपंच रमाकांत राऊत, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, सौ. मनाली होणाळे, सौ. दक्षता सुतार, तसेच खारेपाटण सहकारी पतसंस्थेचे संचालक संतोष पाटणकर, राजेंद्र वरूणकर, सोसायटीचे संचालक विजय देसाई, मोहन पगारे, इस्माईल मुकादम आणि सौ. उज्ज्वला चिके उपस्थित होते.
याशिवाय श्री. किशोर माळवदे, प्रणय गुरसाळे, शमशुद्दीन काझी, वसीम मुकादम, देवानंद इसवलकर, शेखर शिंदे, शेखर कांबळी यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.


