खोकल-मांगेलीच्या डोंगररांगांत ‘डेक्कन हिल रन’चा थरार; साहसी रायडिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
1
खोकल-मांगेलीच्या डोंगररांगांत ‘डेक्कन हिल रन’चा थरार; साहसी रायडिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
खोकल-मांगेलीच्या डोंगररांगांत ‘डेक्कन हिल रन’चा थरार; साहसी रायडिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

खोकल-मांगेलीच्या डोंगररांगांत ‘डेक्कन हिल रन’चा थरार; साहसी रायडिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

दोडामार्ग :
युवा मोर्चा दोडामार्ग यांच्या वतीने खोकल येथे रॉयल एनफिल्डच्या *‘टू-व्हीलर वन-मेक हिल क्लाइंब चॅम्पियनशिप – डेक्कन हिल रन’*च्या दुसऱ्या फेरीचे आयोजन करण्यात आले. वेग, साहस आणि थराराने भरलेल्या या स्पर्धेला परिसरातील नागरिक तसेच दुचाकीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व खोकल गावचे सरपंच देवेंद्र शेटकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, पंचायत समिती सदस्य संजय सातर्डेकर, तालुका उपाध्यक्ष सुनील गवस, ओबीसी मोर्चा सरचिटणीस आनंद तळणकर, प्रवीण गवस, दोडामार्ग शहर अध्यक्ष राजेश फुलारी, युवा मोर्चा दोडामार्ग सरचिटणीस गुरुदास गवस, उपाध्यक्ष गुरुनाथ गवस, शहर अध्यक्ष शंकर रेडकर, शहर उपाध्यक्ष राज बोंद्रे, नगरसेवक समीर रेडकर, मांगेली उपसरपंच सुनील गवस, खोकल उपसरपंच भरत गवस, माजी उपसरपंच कृष्णा गवस, प्रशांत चारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खोकल आणि मांगेली परिसरातील ग्रामस्थ तसेच सहकारी मित्रांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहत उपक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित नागरिकांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवत या साहसी क्रीडा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
खोकलच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या हिल क्लाइंब स्पर्धेत रायडर्सनी आव्हानात्मक मार्गावर आपल्या दुचाकी चालविण्याच्या कौशल्याचे प्रदर्शन केले. वेग, थरार आणि साहसाचा रोमांच अनुभवण्यासाठी परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
युवा मोर्चा दोडामार्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे खोकल-मांगेली परिसरातील पर्यटनाला तसेच साहसी क्रीडा उपक्रमांना चालना मिळण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here