मिशन कोकण साम्राज्यचा उपक्रम; कोकणातील उद्योजकांच्या उत्पादनांची एकाच छताखाली पर्वणी
मुंबई : गणपती उत्सवाच्या खरेदीसाठी मुंबईकरांना कोकणच्या मातीतील अस्सल उत्पादने आणि स्थानिक उद्योजकांनी साकारलेल्या वस्तूंची खरेदी करण्याची खास संधी मिळणार आहे. मिशन कोकण साम्राज्य यांच्या वतीने आयोजित ‘कोकणी बाजारपेठ’ दादर पश्चिम येथे ७ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान भरविण्यात येणार आहे.
कोकणातील उद्योजकांनी मेहनतीने तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ, आकर्षक दागिने, साड्या, कपडे, हस्तकला वस्तू, गिफ्टिंग साहित्य, नैसर्गिक उत्पादने तसेच विविध उपयुक्त वस्तू या बाजारपेठेत नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भायखळा, दादर, लालबाग, परळ, माटुंगा, बांद्रा आणि कुर्ला परिसरातील नागरिकांसाठी ही बाजारपेठ खरेदीची विशेष पर्वणी ठरणार आहे. कोकणातील पारंपरिक चव, कला आणि उद्योजकतेचा अनुभव मुंबईकरांना या माध्यमातून घेता येणार आहे.
स्थळ : स्काऊट हॉल, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर पश्चिम, मुंबई दिनांक : ७, ८ व ९ सप्टेंबर २०२६ वेळ : सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत
स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उत्पादनांना मुंबईतील ग्राहकांपर्यंत थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या बाजारपेठेला भेट देऊन कोकणातील उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक श्री. अजय यादव यांनी केले आहे.