गणपती उत्सव २०२६ शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार; महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांचे कौतुक

0
20

मुंबई :
महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून ओळखला जाणारा गणपती उत्सव २०२६ यंदा उत्साह, भक्ती आणि शांततेच्या वातावरणात पार पडला. उत्सवादरम्यान राज्यभरातील तसेच देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. लाखो भाविकांनी विविध ठिकाणी आणि विसर्जन घाटांवर गर्दी केली असतानाही उत्सवाचे नियोजन आणि व्यवस्थापन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.
गणपती उत्सव २०२६ शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार; महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांचे कौतुक
गणपती उत्सव २०२६ शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार; महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांचे कौतुक
गणपती विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक रस्त्यावर आणि विसर्जन घाटांवर उपस्थित असताना महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे उत्सवाची सांगता शांततेत झाली. वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे.
उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here