दापोलीत १० ऑक्टोबरला JCI Marathon 2026; 5K Marathon व 2K Fun Run चे आयोजन

0
17
दापोलीत १० ऑक्टोबरला JCI Marathon 2026; 5K Marathon व 2K Fun Run चे आयोजन
दापोलीत १० ऑक्टोबरला JCI Marathon 2026; 5K Marathon व 2K Fun Run चे आयोजन

दापोलीत १० ऑक्टोबरला JCI Marathon 2026; 5K Marathon व 2K Fun Run चे आयोजन

पितांबरी अभिनव उत्पादने मुख्य प्रायोजक; प्रवेश मोफत, २७ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
JCI Dapoli च्या वतीने ‘JCI Marathon 2026 – पर्व तिसरे’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता आझाद मैदान, दापोली येथून करण्यात आले आहे. या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक पितांबरी अभिनव उत्पादने आहेत. ‘Run For Peace! Run For Dapoli!!’ हा संदेश घेऊन होणाऱ्या या उपक्रमात 5K Marathon आणि 2K Fun Run अशा दोन प्रकारांचा समावेश आहे.
दापोलीकरांसह सर्व वयोगटातील नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार आहे. 5K Marathon आणि 2K Fun Run मध्ये पुरुष व महिला गटासाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच ६० वर्षांवरील धावपटूंनी 2K Fun Run पूर्ण केल्यास त्यांना विशेष पदक देण्यात येणार असून, सर्व सहभागी खेळाडूंना सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
या मॅरेथॉनसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असून, नोंदणी २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच स्पॉट रजिस्ट्रेशन आणि BIB वितरण १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य, फिटनेस, शांतता आणि दापोलीच्या सकारात्मक संदेशाला बळ द्यावे, असे आवाहन JCI Dapoli तर्फे करण्यात आले आहे.
या मॅरेथॉनच्या आयोजनासाठी JCI Dapoli अध्यक्ष JFM डॉ. कुणाल मेहता, सचिव JC HGF रोशन वेदक, प्रकल्प अध्यक्ष JC HGF मयुरेश शेठ, प्रकल्प संचालक JC फैजान पुरकर आणि प्रकल्प समन्वयक JC पार्थ साबळे यांच्यासह JCI Dapoli चे पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.
नोंदणी व अधिक माहितीसाठी JC HGF रोशन वेदक – ८४४६४०६६६८, JC HGF स्वप्निल मेहता – ९९६०१९९०४६ आणि JFM तेजस मेहता – ८७९६२८२३३७ यांच्याशी संपर्क साधावा.
आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि फिटनेसचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. ‘Run For Peace! Run For Dapoli!!’ या संदेशाला साथ देत दापोलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन JCI Dapoli तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here