गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात वाहतूक नियंत्रणाची अधिसूचना
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात वाहतूक नियंत्रणाची अधिसूचना
वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
रायगड :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाढणारी वाहनांची वर्दळ लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण व पर्यायी मार्गांबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे. तसेच वाहतूक कोंडी झाल्यास उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.