गणेशोत्सवानिमित्त अलिबाग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर
पोलीस अधिकारी व अंमलदारांचा उत्स्फूर्त सहभाग; कर्तव्यासोबत सामाजिक बांधिलकीही जपली
अलिबाग :
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अलिबाग पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.



