घनकचरा व्यवस्थापनातील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

0
8
घनकचरा व्यवस्थापनातील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

महामार्ग व अंतर्गत रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे दिसू नयेत; नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

सिंधुदुर्ग :
जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित शासकीय विभागांनी समन्वयाने व गतीने काम करावे. तसेच पोर्टल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
घनकचरा व्यवस्थापनातील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
घनकचरा व्यवस्थापनातील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयात घनकचरा व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाची बैठक जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, नगरप्रशासन अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील गटविकास अधिकारी आणि नगरपरिषदांचे मुख्याधिकारी ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीत घनकचरा व्यवस्थापनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, ऑनलाइन पोर्टलवर कामांची नोंद, अनधिकृतपणे कचरा टाकण्यावर कारवाई आणि कचऱ्याचे वर्गीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे दिसणार नाहीत, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती तसेच राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत ठेवावी. राज्यस्तरावर दरमहा या कामांचा आढावा घेतला जात असल्याने ग्रामविकास आणि नगरप्रशासन विभागाने विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील अनधिकृतपणे कचरा टाकण्याच्या ठिकाणांची माहिती संकलित करून अधिकृत आणि अनधिकृत कचरा विल्हेवाट स्थळांची ओळख निश्चित करावी. अशा ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईचा छायाचित्रांसह सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
याशिवाय चार स्तरीय कचरा वर्गीकरण प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, असेही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here