सिंधुदुर्गात दुग्धव्यवसायाला चालना देणार; एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट

0
8
सिंधुदुर्गात दुग्धव्यवसायाला चालना देणार; एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गात दुग्धव्यवसायाला चालना देणार; एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट

सिंधुदुर्गात दुग्धव्यवसायाला चालना देणार; एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट

दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा; शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची ग्वाही

सिंधुदुर्ग :
जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या उपक्रमासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ जिल्हा बँकेकडून उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सिंधुदुर्गात दुग्धव्यवसायाला चालना देणार; एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गात दुग्धव्यवसायाला चालना देणार; एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट
बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात दुधाळ जनावरे खरेदी योजनेसंदर्भात दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना दळवी बोलत होते.
गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी दुग्धव्यवसायासारखा शेतीपूरक व्यवसाय उभा करणे आवश्यक आहे, असे दळवी यांनी सांगितले. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने आपल्या गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना या उपक्रमाशी जोडून एक गट तयार करावा. अशा पद्धतीने सामूहिक प्रयत्न केल्यास जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाभार्थ्यांची निवड करताना दुग्ध संस्थांचा अनुभव आणि स्थानिक परिस्थितीची माहिती महत्त्वाची ठरणार आहे. दुग्धव्यवसायाची आवड असलेले, या व्यवसायाचा अनुभव असलेले आणि जनावरांची योग्य काळजी घेण्याची क्षमता असलेले शेतकरी निवडावेत, असे आवाहन त्यांनी केले. जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार असून, चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत दूध उत्पादकांना किमान २० हजार रुपयांचे अतिरिक्त सहकार्य देण्याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच दूध संकलनात वाढ करणाऱ्या संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी आर्थिक मदत देण्याबाबत जिल्हा बँक सकारात्मक असून, यासंदर्भातील प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली.
“बँकेचा उद्देश नफा मिळवणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे,” असे स्पष्ट करत दुग्ध संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करावी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बँकेचे संचालक दिलीप रावराणे, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी आणि दुग्धव्यावसायिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here