कंत्राटी पदभरतीत स्थानिक भूमिपुत्रांना सर्वोच्च प्राधान्य द्या; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे स्पष्ट निर्देश

0
10

स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर; प्रलंबित भरती प्रस्ताव तातडीने मार्गी लावणार

रत्नागिरी :
जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळाची नियुक्ती करताना स्थानिक भूमिपुत्रांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत. स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही सर्व विभागांची प्राथमिकता असली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
कंत्राटी पदभरतीत स्थानिक भूमिपुत्रांना सर्वोच्च प्राधान्य द्या; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे स्पष्ट निर्देश
कंत्राटी पदभरतीत स्थानिक भूमिपुत्रांना सर्वोच्च प्राधान्य द्या; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे स्पष्ट निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी विविध विभागांतील आवश्यक पदे, सध्या भरलेली पदे, रिक्त जागा तसेच आगामी भरती प्रक्रियेची विभागनिहाय माहिती घेतली.
बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. सामंत म्हणाले की, जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना देणे ही प्रत्येक शासकीय विभागाची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे कंत्राटी भरती प्रक्रियेत स्थानिक युवक-युवतींना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. मनुष्यबळ पुरविणाऱ्या बाह्य संस्थांनाही याबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. नियमांच्या चौकटीत राहून संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोनातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास संबंधित विभागांसह स्थानिक बेरोजगारांनाही त्याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच या भरती प्रक्रियेसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय अथवा शासन स्तरावर कोणतेही प्रस्ताव प्रलंबित असल्यास त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा. संबंधित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.
या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here