महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तकाचे प्रकाशन; मुंबईत व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र दालन उभारणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
8

मराठी व्यंगचित्रकलेचा वारसा जपण्याचा शासनाचा पुढाकार

मुंबई :
महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि या कलेचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे स्वतंत्र दालन उभारण्यासाठी शासन पुढाकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
व्यंगचित्रकलेचे महत्त्व विशद करताना मुख्यमंत्री म्हणाले की, व्यंगचित्र ही एक प्रभावी कला आहे. एकही शब्द न उच्चारता या कलेच्या माध्यमातून प्रभावी भाष्य करता येते आणि नेमका संदेश लोकांपर्यंत पोहोचवता येतो. कोणत्याही काळातील घडामोडी, सामाजिक परिस्थिती किंवा त्यातील विरोधाभास व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम मराठी व्यंगचित्रकारांनी सातत्याने केले आहे.
व्यंगचित्रातून एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. ही विलक्षण कला महाराष्ट्राच्या मातीत पूर्वापार जोपासली गेली आहे. या कलेचा वारसा जतन करून तो भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ हे पुस्तक निश्चितच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
या प्रकाशन सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि पुस्तकाचे संपादक व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here