समृद्धी महामार्गावर ६ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीवर निर्बंध; भरवीर ते इगतपुरीदरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक ठराविक वेळेत बंद
समृद्धी महामार्गावर ६ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीवर निर्बंध; भरवीर ते इगतपुरीदरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक ठराविक वेळेत बंद
नाशिक : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच इतर डोंगर उतारांवरून दरड किंवा दगड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी संरक्षक जाळी बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामादरम्यान प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला आहे.
वाहतूक बंद राहण्याच्या वेळा :
सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत
दुपारी १ ते २ वाजेपर्यंत
दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत
वरील तीन वेळांमध्ये भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. उर्वरित वेळेत वाहतूक सुरू राहण्याचे नियोजन आहे.
प्रवाशांनी या निर्बंधांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, तसेच काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य र