घाडीगांवकर समाजाचे स्नेहसंमेलन २२ नोव्हेंबरला; जोगेश्वरीत कविसंमेलनासह सांस्कृतिक कार्यक्रम
घाडीगांवकर समाज बंधू-भगिनींना उपस्थित राहण्याचे केले आवाहन
मुंबई –
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई संस्थेच्या अंधेरी विभागाने समस्त घाडीगांवकर समाजाचे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे.एकत्र येऊया… नाती जपुया…. समाजाचा स्नेहबंध अधिक दृढ करूया ! हा विचार घेऊन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाजातील सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवक-युवती आणि बालमित्र यांच्यासह समाजातील प्रत्येक कुटुंबाने एकत्र यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, नवीन पिढीचा परस्पर परिचय व्हावा आणि आपुलकी, बंधुभाव व एकोपा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन रविवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता मांगल्य मंगल कार्यालय, हिंदू फ्रेंड सोसायटी रोड नं. ३, इस्माईल युसुफ कॉलेजजवळ, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई – ४०००६० या ठिकाणी भरवण्यात येणार आहे.संमेलनात मंगलदीप प्रज्वलन, स्वागत व परिचय , ज्येष्ठांचे मार्गदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम,काव्यवाचन, गुणदर्शन व विशेष सत्कार असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे.
घाडीगांवकर समाजातीलच कवींचे कवी संमेलन हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे. या स्नेहसंमेलनाला समस्त घाडीगांवकर समाजातील बंधू-भगिनींनी सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन अंधेरी विभागाचे अध्यक्ष विजय आत्माराम घाडीगांवकर ,मध्यवर्ती सदस्य आत्माराम सहदेव गांवकर ,सचिव सचिन सुधाकर गांवकर,खजिनदार विलास धोंडू गांवकर तसेच घाडीगांवकर संस्थेचे राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख विजय गांवकर यांनी केले आहे.