घोणसरी-पिंपळवाडी, खवळेभाटले परिसरात स्ट्रीट लाईटचा शुभारंभ

0
19
घोणसरी-पिंपळवाडी, खवळेभाटले परिसरात स्ट्रीट लाईटचा शुभारंभ
घोणसरी-पिंपळवाडी, खवळेभाटले परिसरात स्ट्रीट लाईटचा शुभारंभ

घोणसरी-पिंपळवाडी, खवळेभाटले परिसरात स्ट्रीट लाईटचा शुभारंभ

ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

घोणसरी l प्रतिनिधी :
घोणसरी-पिंपळवाडी आणि खवळेभाटले परिसरातील विविध मार्गांवर स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामांचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या मानसी बाळकृष्ण मराठे तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
या कामांमध्ये पिंपळवाडी येथील पेडणेकर घर ते खाड्ये यांच्या घरापर्यंत स्ट्रीट लाईट, तसेच घोणसरी-पिंपळवाडी मुख्य रस्ता आणि घोणसरी मुख्य रस्ता ते खवळेभाटले या मार्गावरील स्ट्रीट लाईटचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्या मानसी मराठे यांनी घोणसरी गावातील पिंपळवाडी व खवळेभाटले परिसरातील स्ट्रीट लाईटसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आता प्रत्यक्षात आली आहे.
या परिसरातील मार्गावर सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. अनेक ग्रामस्थ दूध घालण्यासाठी डेअरीवर जातात. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकही या मार्गाचा नियमित वापर करतात. त्यामुळे स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध झाल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची ये-जा अधिक सुरक्षित आणि सोयीची होणार आहे.
या कामांच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, घोणसरी सरपंच प्रसाद राणे, उपसरपंच अंकिता परब, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक राणे, आप्पा पेडणेकर, दिवाकर कारेकर यांच्यासह पिंपळवाडी परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पंचायत समिती सदस्या मानसी मराठे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here