चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव
दापोली- ‘विद्यार्थ्यांची नासा-इस्रो भेट’उपक्रमांतर्गत दापोली तालुकास्तरीय चाळणी परीक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील कु. आरोही महेश मुलुख हिने प्रथम तर कु. नीरजा मनोज वेदक हिने द्वितीय क्रमांक पटकावून अव्वल यश संपादन केल्याबद्दल दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी बळीराम राठोड तसेच गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी चंद्रनगर शाळेत दोन्ही विद्यार्थीनी तसेच मार्गदर्शक शिक्षिका मानसी सावंत यांचे कौतुक व गौरव केला. यावेळी चंद्रनगर शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनिल मुलुख, मुख्याध्यापक मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, रेखा ढमके उपस्थित होते.
तालुकास्तरीय चाळणी परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केलेल्या कु. आरोही महेश मुलुख, कु. नीरजा मनोज वेदक या दोन्ही विद्यार्थीनींसह दापोली तालुक्यातील एकूण दहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय चाळणी परीक्षा तसेच मुलाखतीसाठी निवड झाली आहे. या सर्वांना पुढील जिल्हास्तरीय परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
photo oli -दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी बळीराम राठोड,गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, विद्यार्थीनी तसेच मार्गदर्शक शिक्षिका मानसी सावंत चंद्रनगर शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनिल मुलुख, मुख्याध्यापक मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, रेखा ढमके.


