चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर झाड कोसळले; चालक गंभीर जखमी, १७ प्रवासी बचावले
कुडाळ, दि. १ जून : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर अचानक झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून वाहनातील १७ प्रवासी थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलर प्रवाशांना घेऊन मार्गस्थ असताना रस्त्यालगतचे झाड अचानक वाहनावर कोसळले. झाडाचा मोठा भाग वाहनाच्या पुढील भागावर पडल्याने चालकाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहनातील १७ प्रवासी सुदैवाने बचावले असून काहींना किरकोळ दुखापती झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, रस्त्यालगतची धोकादायक आणि जीर्ण झाडे वेळेवर हटविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण आणि नुकसानाचा पंचनामा संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.सून अशा धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.