चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवार १२ जून रोजी चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या ग्रामसभेत पिठासीन अधिकारी आत्माराम परब विस्तार अधिकारी पंचायत समिती मालवण यांनी ग्रामपंचायत प्रशासक सौ. स्वरा पालकर, ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर केले. चक्रानूक्रमे फिरणाऱ्या आरक्षणा मध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग आरक्षणासाठी प्रभाग एक आणि प्रभाग दोन मध्ये चिठ्ठी द्वारा सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग दोन मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग मध्ये जागा निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे प्रभाग निहाय आरक्षणास कोणीही आक्षेप न घेता सर्वांनूमते मंजूर करण्यात आले.
प्रभाग रचना अशी असणार
प्रभाग क्रमांक – १ – सडेवाडी, तेरई, भगवंतगड, लब्देवाडी
प्रभाग क्रमांक – २ – भटवाडी, देऊळवाडी, कुंभारवाडी
प्रभाग क्रमांक – ३ – चिंदर बाजार, अपराज कोंडवाडी, नागोचीवाडी, खरीवाडी, पडेकाप, बागवाडी
प्रभाग क्रमांक – ४ – गावठणवाडी, गावडेवाडी, पालकरवाडी, पाटणवाडी, साटमवाडी
कोणत्या प्रभागात कोणत आरक्षण
प्रभाग क्रमांक १ – सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक २ -सर्वसाधारण, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक ३ -सर्वसाधारण, सर्व साधारण महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक ४ – सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला
सरपंच आरक्षण यापूर्वीच जाहीर झाल्याने यामध्ये एकूण सदस्य संख्या ११ असून ४ सर्वसाधारण, ५ सर्व साधारण महिला, १ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तर १ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अशी आहे.