शिवसेना पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे यांची निवड
शिवसेना पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे यांची निवड
सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश दिवाकर कोदे यांची नियुक्ती केली आहे. कणकवली विजय भवन येथे आज महेश कोदे यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.