जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला खासदार बाळ्या मामा आणि निलेश लंके यांचा पाठिंबा

0
18

नवी दिल्ली
 राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळ्या मामा आणि खासदार निलेश लंके यांनी प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा दर्शविला.
यावेळी दोन्ही खासदारांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, “देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असलेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यांच्या हक्कांची पायमल्ली कधीही सहन केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत.”
विद्यार्थ्यांचा हा संघर्ष लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी सुरू असून, या लढ्यात आपण विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत ठामपणे उभे राहू, अशी ग्वाहीही खासदार बाळ्या मामा आणि निलेश लंके यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here