जखमी गोविंदांची महापौर रितू तावडे यांच्याकडून KEM रुग्णालयात आस्थेने विचारपूस

0
36

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जखमी झालेल्या गोविंदांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (KEM) रुग्णालयात रात्री भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांनी जखमी गोविंदा तसेच त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला.

दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई शहर व उपनगरातील विविध दहीहंडी मंडळांना मुंबईची प्रथम सेविका या नात्याने महापौरांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा पथकांचे कौशल्य अनुभवत त्यांनी गोविंदांचा उत्साह वाढविला.
त्यानंतर त्यांनी KEM रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी गोविंदांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सर्व जखमी गोविंदांवर योग्य, तत्पर आणि दर्जेदार उपचार करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.
सुदैवाने सर्व गोविंदा सुरक्षित असून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या भेटीवेळी KEM रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, अस्थिव्यंग शल्यक्रिया विभाग प्रमुख डॉ. मोहन देसाई तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here