जम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
महाराष्ट्राच्या लोककला, शास्त्रीय नृत्य व गायनाचे मनोहारी सादरीकरण
जम्मू :
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे जम्मू येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. पद्मश्री पद्मा सचदेव गव्हर्नमेंट कॉलेज ऑडिटोरियम, गांधीनगर, जम्मू येथे शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



