जल-स्वयंपूर्णतेत रायगडची खारीवली ग्रामपंचायत देशात अव्वल

0
17
जल-स्वयंपूर्णतेत रायगडची खारीवली ग्रामपंचायत देशात अव्वल
जल-स्वयंपूर्णतेत रायगडची खारीवली ग्रामपंचायत देशात अव्वल

जल-स्वयंपूर्णतेत रायगडची खारीवली ग्रामपंचायत देशात अव्वल

रायगड
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खारीवली ग्रामपंचायतीने ‘जल-स्वयंपूर्ण पंचायत’ संकल्पनेअंतर्गत अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. जनसहभाग, प्रभावी जलसंधारण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या बळावर खारीवली ग्रामपंचायतीने जलसमृद्धी व आत्मनिर्भरतेचा आदर्श निर्माण केला आहे.

दीनदयाल उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कारांतर्गत प्रदान करण्यात आलेला हा सन्मान तळागाळातील जलसंधारण, शाश्वत जलव्यवस्थापन आणि जलसुरक्षा मजबूत करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतो. पाणीटंचाईच्या आव्हानांवर मात करत खारीवलीने ग्रामविकासाचा नवा आदर्श घालून दिला आहे.
या यशामुळे केवळ रायगड जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला असून देशभरातील ग्रामपंचायतींसाठी खारीवलीचा आदर्श प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here