जवाहर नवोदय विद्यालय, पडवे येथे इयत्ता ११ वी (कला शाखा) ‘स्पॉट ॲडमिशन’साठी २९ जून अर्ज पर्यंत पाठवावेत

0
25

राजापूर/रत्नागिरी
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, पडवे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी कला (Arts) शाखेतील रिक्त जागांसाठी थेट प्रवेश (Spot Admission) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २९ जून २०२६ असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली आहे.
या प्रवेशासाठी विद्यार्थी CBSE संलग्न शाळा किंवा राज्य मंडळातून इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी विद्यार्थ्यांनाच गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
🔹 रीतसर भरलेला प्रवेश अर्ज
🔹 इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणपत्रक (Marksheet)
🔹 रहिवासी पुरावा (Domicile / Residence Certificate)
अर्ज प्रक्रिया दोन प्रकारे करता येईल—
🔹 प्रत्यक्ष विद्यालयात अर्ज जमा करणे
🔹 किंवा [email protected] या ईमेलवर अर्ज पाठवणे
मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here