जागतिक ध्यान दिनानिमित्त रत्नागिरी व चिपळूणमध्ये ध्यान सत्रांचे आयोजन

0
270
जागतिक ध्यान दिनानिमित्त रत्नागिरी व चिपळूणमध्ये ध्यान सत्रांचे आयोजन
जागतिक ध्यान दिनानिमित्त रत्नागिरी व चिपळूणमध्ये ध्यान सत्रांचे आयोजन

जागतिक ध्यान दिनानिमित्त रत्नागिरी व चिपळूणमध्ये ध्यान सत्रांचे आयोजन

रत्नागिरी – जागतिक ध्यान दिनानिमित्त रत्नागिरी आणि चिपळूण येथील मुख्य टपाल कार्यालयांमध्ये विशेष ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरीतील सत्र योग विद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन व नित्या प्राणिक हीलिंग सेंटरच्या वतीने घेण्यात आले, तर चिपळूण येथील कार्यक्रमाची धुरा नित्या प्राणिक हीलिंग सेंटरचे प्रमुख तेजस महागावकर आणि सचिन गुरव यांनी सांभाळली.

रत्नागिरी टपाल कार्यालयात आयोजित या सत्राचे मार्गदर्शन अश्विनी शेलार, अमोल मोरे, आरुषी गावडे, नितीन गावडे, मयूर आणि आरती दप्तरदार यांनी केले. हे कार्यक्रम सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजेपर्यंत पार पडले. चिपळूण व रत्नागिरी हेड पोस्ट ऑफिसमधील मान्यवर आणि कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आणि दोन्ही सत्रांमध्ये सुमारे १२० लोक उपस्थित होते.

नित्या प्राणिक हीलिंग सेंटर रत्नागिरीत मारुती मंदिर, दामले हायस्कूलजवळील सेंटरमध्ये प्राणिक हीलिंगचे विविध कोर्स आयोजित करते. गेल्या दोन वर्षात अनेकांनी या कोर्सचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावले आहे. तसेच, सेंटरच्या वतीने विविध शाळांमध्ये ध्यान शिबिरे आयोजित केली जातात. शिवाय संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू संस्था आणि लोकांना अन्न व कपड्यांच्या स्वरूपात मदत केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here