जालगावात जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाचा कुऱ्हाडीने हल्ला; दोघेही गंभीर जखमी

0
15

दापोली प्रतिनिधी | अरविंद मांडवकर –दि. २३ सप्टेंबर
दापोली तालुक्यातील जालगाव-पांगारवाडी येथे जन्मदात्या आई-वडिलांवर त्यांच्या मुलानेच हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२३ सप्टेंबर) दुपारी घडली. या हल्ल्यात वडील मधुकर आग्रे आणि आई अनिता आग्रे हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
जालगावात जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाचा कुऱ्हाडीने हल्ला; दोघेही गंभीर जखमी
जालगावात जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाचा कुऱ्हाडीने हल्ला; दोघेही गंभीर जखमी
जालगावचे पोलीस पाटील धीरज कदम यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मधुकर आग्रे आणि त्यांची पत्नी अनिता आग्रे हे आपल्या राहत्या घरी असताना त्यांचा मुलगा सुनील आग्रे (वय अंदाजे ४० वर्षे) याने त्यांच्यावर हल्ला केला.
प्राथमिक माहितीनुसार, सुनील आग्रे याने वडील मधुकर आग्रे यांच्या डोक्यावर आणि हातावर कुऱ्हाडीने, तर आई अनिता आग्रे यांच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने हल्ला केला.
या घटनेत दोघांच्याही शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. जखमी मधुकर आग्रे आणि अनिता आग्रे यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे जालगाव-पांगारवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंचनामा आणि पोलिस तपासानंतर या घटनेमागील कारण समोर येणार आहे.
दरम्यान, दापोली पोलिसांनी सुनील आग्रे याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
घटनेचे नेमके कारण काय होते आणि हल्ल्यामागे अन्य काही बाबी आहेत का, याचा तपास आता दापोली पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here