कशेळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाची ८० वर्षांची उज्ज्वल परंपरा; भक्तीमय वातावरणात बाप्पाचे दर्शन
कशेळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाची ८० वर्षांची उज्ज्वल परंपरा; भक्तीमय वातावरणात बाप्पाचे दर्शन
कशेळी :
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कशेळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ८० व्या वर्षानिमित्त भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात गणरायाचे दर्शन घेण्यात आले. भिवंडीचे खासदार बाळ्या मामा मात्रे यांनी मंडळाला भेट देत श्री गणेशाचे दर्शन घेतले.
कशेळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तब्बल ८० वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या दीर्घ भक्तिमय प्रवासात मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गावकऱ्यांची श्री गणेशावरील श्रद्धा आजही कायम असल्याचे यावेळी दिसून आले.
८० वर्षांपासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरत आहे. गणेशोत्सवाच्या काळात गावात निर्माण होणारे भक्तिमय वातावरण आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरत आहे.
श्री विघ्नहर्त्याच्या चरणी कशेळी ग्रामस्थांसह सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.