कोपरखैरणेतील गणेश मित्र मंडळाच्या गणरायाचे वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतले दर्शन
कोपरखैरणेतील गणेश मित्र मंडळाच्या गणरायाचे वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतले दर्शन
नवी मुंबई :
कोपरखैरणे येथील बालाजी गार्डन सोसायटीमध्ये गणेश मित्र मंडळाच्या वतीने विराजमान करण्यात आलेल्या श्री गणरायाचे वनमंत्री गणेश नाईक यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले.
कोपरखैरणेतील गणेश मित्र मंडळाच्या गणरायाचे वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतले दर्शन
यावेळी गणेश नाईक यांनी गणरायाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. तसेच मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत गणेशोत्सवाच्या उत्साहात सहभाग घेतला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.