नवी मुंबई महापालिका भरती : १५ संवर्गांची मेरिट लिस्ट ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

0
12
नवी मुंबई महापालिका भरती : १५ संवर्गांची मेरिट लिस्ट ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
नवी मुंबई महापालिका भरती : १५ संवर्गांची मेरिट लिस्ट ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

नवी मुंबई महापालिका भरती : १५ संवर्गांची मेरिट लिस्ट ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील पदे सरळसेवेने भरण्यासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील १५ संवर्गांची मेरिट लिस्ट ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
महापालिकेच्या जाहिरात क्रमांक आस्था/०१/२०२५, दिनांक २७ मार्च २०२५ आणि शुद्धीपत्रक दिनांक २९ एप्रिल २०२५ अनुषंगाने ‘स्कोअर कार्ड’ ११ सप्टेंबर २०२६ रोजी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या १६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियर), उद्यान अधीक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ, सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, आरोग्य सहाय्यक (महिला), पशुधन पर्यवेक्षक, ध्वनीचालक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस, कक्षसेविका/आया आणि कक्षसेवक या १५ संवर्गांची मेरिट लिस्ट ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, जाहिरातीतील उर्वरित १५ संवर्गांच्या पदभरतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
भरती प्रक्रियेसंदर्भात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे किंवा अन्य मागणी करणाऱ्या व्यक्तींच्या भूलथापांना उमेदवारांनी बळी पडू नये, तसेच अशा प्रकारची फसवणूक आढळल्यास स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भरतीबाबत अधिकृत माहितीसाठी उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अधिकृत सोशल मीडिया पेजवरच विश्वास ठेवावा, असे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here