जिल्हास्तरीय लोकशाही दिन ०४ मार्च रोजी

0
130
रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला 'विशेष लोकअदालत'
रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला 'विशेष लोकअदालत'

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ०४ मार्च रोजी

रायगड l प्रतिनिधी

जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा करण्यात येणारा लोकशाही दिन माहे मार्च २०२६ मध्ये पुढे ढकलण्यात आला आहे. होळी सणानिमित्त पहिला सोमवार दि. ०२ मार्च रोजी स्थानिक सुट्टी घोषित करण्यात आली असून, दि. ०३ मार्च २०२६ रोजी धुळीवंदन निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने लोकशाही दिन बुधवार दि. ०४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा लोकशाही दिन दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडणार आहे. नागरिकांच्या तक्रारी, मागण्या व विविध प्रशासकीय प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.

याबाबतची माहिती रायगड उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांनी दिली असून, संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारी व निवेदने वेळेत सादर करून या लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या समस्या थेट जिल्हा -धिकारी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळते. प्राप्त तक्रारींवर तत्काळ सुनावणी घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातात. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्यास या उपक्रमाचा हातभार लागत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here