रत्नागिरीत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

0
83
रत्नागिरीत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात
रत्नागिरीत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

रत्नागिरीत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

रत्नागिरी l प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा येथे दि. १३ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हा क्रीडा संकुल, एम.आय.डी.सी. मिरजोळे येथे पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहत असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

सदर भरती प्रक्रिया मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सक्षम मार्गदर्शन व निगराणीखाली शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. सर्व टप्प्यांमध्ये नियमांचे काटेकोर पालन केले जात सअल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.भरती प्रक्रियेदरम्यान सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार आपापली कर्तव्ये अत्यंत जबाबदारीने पार पाडत असून, उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. वैद्यकीय तपासणी, कागदपत्रांची पडताळणी तसेच शारीरिक चाचण्या नियोजनबद्ध पद्धतीने घेतल्या जात आहेत.

यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे सुरू असून, पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आल्याने उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here