जिल्हा परिषद ठाणे (Zilla Parishad Thane) येथे सोमवारी (दि. ०८) मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव (Ranjit Yadav) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांची साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, ई-ऑफिस अंमलबजावणी, स्वच्छ भारत अभियान २.०, पीएम-जनमन, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६, पेन्शन प्रकरणे, ऑडिट अनुपालन तसेच न्यायालयीन प्रकरणांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली.
याशिवाय विविध विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी सर्व खाते प्रमुखांनी आपल्या विभागाच्या कामकाजाचा अहवाल सादर केला तसेच प्रलंबित बाबींच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.