महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
18

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (Mahatma Phule Backward Class Development Corporation)  मार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी विविध स्वयंरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये ५० टक्के अनुदान योजना, बीजभांडवल योजना आणि १ लाख रुपये थेट कर्ज योजना यांचा समावेश आहे. या योजनांद्वारे स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्याचा उद्देश आहे.
अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज महादिशा पोर्टल वर सादर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
या सर्व योजना राष्ट्रीयकृत बँका तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असून, अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ही महत्त्वाची अट आहे.
पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here