ज्येष्ठ लेखक माधव गव्हाणकर यांच्या कार्याचा गौरव!

0
15
ज्येष्ठ लेखक माधव गव्हाणकर यांच्या कार्याचा गौरव!
ज्येष्ठ लेखक माधव गव्हाणकर यांच्या कार्याचा गौरव!

ज्येष्ठ लेखक माधव गव्हाणकर यांच्या कार्याचा गौरव!

प्रबोधनात्मक लेखनाची दखल; डॉ. नरेंद्र दाभोलकर परिवारातर्फे एक लाख रुपयांचा सन्मान

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली येथील ज्येष्ठ लेखक, अध्यापक आणि परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ते श्री. माधव गव्हाणकर यांनी गेली तीस वर्षे दापोलीतून केलेल्या प्रबोधनात्मक लेखनाची दखल घेत, सातारा येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर परिवारातर्फे त्यांना नुकतीच एक लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन गौरविण्यात आले.
योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी दहा विषयतज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. या समितीने गव्हाणकर यांच्या दीर्घकालीन सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्याचा विचार करून त्यांची निवड केली.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. माधव गव्हाणकर म्हणाले, “माझे संघर्षमय जीवन ही एकट्याची लढाई आहे. मात्र महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी आजवर माझे शेकडो लेख प्रसिद्ध करून माझे पुरोगामी विचार सर्वदूर पोहोचवले. दलित युवकांसह अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना स्थिरस्थावर होण्यासाठी मी मदत करू शकलो. मला मिळालेल्या या आर्थिक आधाराचे समाधान आहे, कारण हा गुणवत्तेचा सन्मान आहे.”
श्री. गव्हाणकर हे पर्यावरणवादी तसेच अंधश्रद्धाविरोधी लेखक म्हणून परिचित आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून ते दापोली येथील श्री. रामराजे महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागात ग्रामीण विद्यार्थ्यांना पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमातील विविध विषयांचे अध्यापन करीत आहेत.
लेखन आणि अध्यापनासोबतच गव्हाणकर यांनी बालसाहित्याच्या क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले असून, त्यांच्या बालसाहित्याची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रबोधनात्मक लेखन, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणविषयक भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत दिलेले योगदान यामुळे त्यांचा हा सन्मान विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here