‘झिरो चलन’ सुविधेमुळे २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून दिलासा
‘झिरो चलन’ सुविधेमुळे २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून दिलासा
महाराष्ट्र :
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणींचा अडथळा येऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क न भरता परीक्षा अर्ज दाखल केले आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, तसेच त्यांना परीक्षेला बसताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. ‘झिरो चलन’ सुविधेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्याची गरज न पडता अर्ज दाखल करणे शक्य झाले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळत असून, त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींवर परिणाम होऊ नये, या दृष्टीने प