टपाल ग्राहकांच्या तक्रारींसाठी ४ डिसेंबरला पणजी येथे क्षेत्रीय डाक अदालत

0
7
टपाल ग्राहकांच्या तक्रारींसाठी ४ डिसेंबरला पणजी येथे क्षेत्रीय डाक अदालत
टपाल ग्राहकांच्या तक्रारींसाठी ४ डिसेंबरला पणजी येथे क्षेत्रीय डाक अदालत

टपाल ग्राहकांच्या तक्रारींसाठी ४ डिसेंबरला पणजी येथे क्षेत्रीय डाक अदालत

रत्नागिरी विभागातील तक्रारदारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी :
भारतीय डाक विभागाच्या ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे त्वरित आणि योग्य निराकरण करण्यासाठी गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी यांच्या वतीने शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता क्षेत्रीय स्तरावरील ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयात होणार असून, रत्नागिरी विभागातील संबंधित तक्रारदारांनी आपले अर्ज ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन रत्नागिरी विभागाच्या डाकघर अधीक्षकांनी केले आहे.

सहा आठवड्यांपासून प्रलंबित तक्रारींची दखल

डाक विभागाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजासंदर्भात केलेल्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झालेले नाही किंवा ज्यांना अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या डाक अदालतीत दखल घेतली जाणार आहे. यामध्ये साधे टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल सेवा, बचत बँक आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांबाबतच्या तक्रारींचा समावेश आहे.
या अदालतीत डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी तक्रारदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असून, त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तक्रार अर्ज कसा सादर करावा?

तक्रारदारांनी अर्जामध्ये आपल्या तक्रारीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. तसेच मूळ तक्रार दाखल केल्याची तारीख आणि ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार पाठविण्यात आली होती, त्या अधिकाऱ्याचे नाव व पत्ता स्पष्टपणे नमूद करावा.
तक्रार अर्ज अतिरिक्त प्रतीसह ‘सहाय्यक डाक निदेशक-१, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी – ४०३००१’ या पत्त्यावर ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे डाक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here