सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी; नाशिक येथे मोफत एसएसबी पूर्वप्रशिक्षण

0
6
सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी; नाशिक येथे मोफत एसएसबी पूर्वप्रशिक्षण
सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी; नाशिक येथे मोफत एसएसबी पूर्वप्रशिक्षण

सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी; नाशिक येथे मोफत एसएसबी पूर्वप्रशिक्षण

रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांच्या १० डिसेंबरला निवड मुलाखती

रत्नागिरी :
भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी मोफत एसएसबी पूर्वप्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र (PCTC), नाशिक रोड, नाशिक येथे १४ ते २३ डिसेंबर २०२६ या कालावधीत मोफत ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) कोर्स क्रमांक ६८’ आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची निवड मुलाखत १० डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.
प्रशिक्षणासाठी आवश्यक पात्रता
या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालीलपैकी किमान एक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘अ’ किंवा ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण असावे आणि एनसीसी ग्रुप मुख्यालयाने एसएसबी मुलाखतीसाठी शिफारस केलेली असावी.
याशिवाय टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) किंवा युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम (UES) अंतर्गत एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर प्राप्त झालेले असावे किंवा संबंधित शिफारस यादीत उमेदवाराचे नाव असावे.
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे
मुलाखतीस उपस्थित राहताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW पोर्टलमध्ये ‘Resources – PCTC Nashik – SSB 68’ या विभागातून प्रवेशपत्र व आवश्यक परिशिष्टे डाउनलोड करावीत. ही कागदपत्रे व्हॉट्सॲप क्रमांक ९१५६०७३३०६ वरूनही उपलब्ध करून घेता येतील. प्रवेशपत्र व परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्णपणे भरून मुलाखतीच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रशिक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या प्रशिक्षण कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक ०२५३-२४५१०३२, व्हॉट्सॲप क्रमांक ९१५६०७३३०६ आणि ई-मेल [email protected] असा आहे. कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here