ट्रान्स-हार्बर लोकल सेवा विस्कळीत; तुर्भे–कोपर खैराणे दरम्यान रुळांखालील मातीची धूप

0
39

नवी मुंबई
तुर्भे आणि कोपर खैराणे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांखालील मातीची धूप झाल्याने ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, धूप झाल्यामुळे अप आणि डाउन दोन्ही लाईन्स सध्या वाहतुकीसाठी असुरक्षित घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व लोकल सेवा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पथके पाठवली असून रुळांच्या दुरुस्तीचे व माती स्थिरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अभियंते आणि तांत्रिक पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.
या मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्याने नवी मुंबई परिसरातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सेवा पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here