महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांना राष्ट्रीय पुरस्कारांची संधी

0
18
महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांना राष्ट्रीय पुरस्कारांची संधी
महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांना राष्ट्रीय पुरस्कारांची संधी

महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांना राष्ट्रीय पुरस्कारांची संधी

३१ जुलैपर्यंत नामांकन सादर करण्याचे आवाहन

मुंबई
 महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच इतर राष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे.
महिलांच्या कार्याची दखल घेण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल आणि संबंधित संकेतस्थळ सुरू केले असून पात्र महिलांना आपली माहिती ऑनलाइन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांसाठी इच्छुक व पात्र महिलांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर आपले नामांकन सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, उद्योजकता, कला, विज्ञान आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना या पुरस्कारांद्वारे सन्मानित करण्यात येते.
या पुरस्कारांची घोषणा २६ जानेवारी २०२७ रोजी करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महिलांनी आपल्या कार्याची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे निर्धारित मुदतीपूर्वी ऑनलाइन सादर करून या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here