ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

0
13

२१ पैकी १६ जागांवर बाजी

ठाणे, दि. २८ : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत २१ पैकी १६ जागांवर यश संपादन केले. या निकालामुळे परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला.
या निवडणुकीत सहकार पॅनलचे नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत बँकेवरील वर्चस्व कायम राखले.
निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सहकार क्षेत्रातील हा विजय विकासाभिमुख धोरणांवरील विश्वासाचे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया सहकार पॅनलच्या नेत्यांनी व्यक्त केली.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची वित्तीय संस्था मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय आणि सहकार क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here