ठाणे शहर पोलिसांकडून माजिवडे शाळेत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम
ठाणे : मा. पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री. आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण शिक्षण संस्था, माजिवडे येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गुड टच–बॅड टच विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोलीस हेल्पलाइन 112 आणि सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी सायबर हेल्पलाइन 1930 यांची माहिती देण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, जागरूकता आणि कायद्याबाबतची जाणीव वाढण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


