पीव्हीआर आयनॉक्सच्या भारतातील सर्वात उंच मल्टिप्लेक्सची सुरुवात
लेह : मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची साखळी पीव्हीआर आयनॉक्सने लेहमध्ये ११,५०० फूट उंचीवर भारतातील सर्वात उंच २-स्क्रीन मल्टिप्लेक्स सुरू करून एक नवा विक्रम केला आहे. हा मल्टिप्लेक्स लेह–मनाली बायपास रोडवरील साबू येथील सोलर कॉलनीत सुरू करण्यात आला आहे.

या अत्याधुनिक मल्टिप्लेक्समुळे लेह व आसपासच्या भागातील नागरिकांसह पर्यटकांना दर्जेदार चित्रपटगृहाचा अनुभव मिळणार असून, उंचावरील भागात आधुनिक मनोरंजन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


