ठाण्याच्या प्रणव देसाई यांना पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक
ठाण्याच्या प्रणव देसाई यांना पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक
१०० मीटर T64 धावण्यात चमकदार कामगिरी
ठाणे :
जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या २०२६ च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत ठाण्याचे सुपुत्र प्रणव देसाई यांनी पुरुषांच्या १०० मीटर T64 धावण्याच्या अंतिम फेरीत कांस्यपदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी ११.९६ सेकंदांत शर्यत पूर्ण करत भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.
२०२२ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत प्रणव देसाई चौथ्या स्थानावर राहिले होते. यंदाच्या स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक जिंकत आपल्या कामगिरीत सुधारणा केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाणे तसेच महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला.
सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर प्रणव यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.