पोलीस स्मृती दिनानिमित्त मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडून अमर हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई :
देशाचे रक्षण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर हुतात्म्यांना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विनम्र अभिवादन केले. पोलीस स्मृती दिनानिमित्त नायगाव येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ‘पोलीस स्मृतीदिन संचलन’ कार्यक्रमात त्यांनी पोलीस स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून वीर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते. यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी, मान्यवर आणि नागरिकांनीही हुतात्म्यांना अभिवादन केले.



